१२.५५ ए एम - ११.०२.०९ ट्रान्स!

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

मी नसतो तर कशास येथे पेले असते?
दिवाळखोरी मनावणारे ठेले असते!

मी आहे, जग आहे, हेही भरपुर आहे
दोघे नसतो, काय न जाणे केले असते?

जीवन म्हणजे "सजीवतेचे दाव पुरावे"
जरा चूक झाली असती तर नेले असते

नेम नेमका जिथे नको त्या तिथेच लागे
मला कळावे त्याआधी वळलेले असते

रक्त ओतले, कविता केली, गुन्हाच झाला
यमक जुळविता नशिबी श्रीफल, शेले असते

मी जाताना केले नाही भले कुणाचे
लेकाचे माझ्याआधीही गेले असते










गझल