अबोली !!!

supriya.jadhav7 - ⏱ १ मिनिट

अबोली !!!
.
*

अजस्त्र ज्वाला लपापणा-या कणात माझ्या!
सहस्त्र लाटा उधाणती का मनात माझ्या?

*

मनाप्रमाणे निकाल लावू भल्याभल्यांचा,
मनुष्य कोठे.....? कुबेर मिंधा धनात माझ्या!

*

जगोत किंवा मरोत कोणी तमा कुणाला?
लखाखणारा सुराच आता ऋणात माझ्या!

*

घरी नि दारी सदैव नांदी नराधमांची,
मिळे उपेक्षा पदोपदी ’या’ जनात माझ्या!

*

सुगंध देणे,मिटून जाणे क्षणाक्षणाने,
मुक्या-मुक्याने भिने अबोली तनात माझ्या!

*

-सुप्रिया (जोशी) जाधव.

गझल