आभाळ चांदण्यांचे सावरावे आता
हे पूर आसवांचे आवरावे आता
खोटेच चेहरे, खोटेच हास्य होते
वास्तव हे जगाला दाखवावे आता
मी घेतले न त्यांना पारखूनी तेंव्हा
ईमान काय त्यांचे आजमावे आता?
केलेस हाल तू माझे असे काही की
पाहून हे चिरेही पाझरावे आता!
गेले कुठेतरी 'जे' प्राण माझे होते
तेथे निरोप कैसे पाठवावे आता?
सोयीनुसार त्यांनी वार होते केले
मीही कुणा-कुणाला आठवावे आता?
मी पेटवेन ऐसी ज्योत या क्रांतीची
तारे हजार त्यांचे काजळावे आता...
-नितीन
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा