आज जे जे येणार आहे
ते ते उद्या जाणार आहे
मित्र शत्रु जमले दारी
काय मी मरणार आहे
जे वसंती प़क्षीहीन
झाड ते मरणार आहे
जगणे सुखाचे क्षणीक
दु:ख ना सरणार आहे
का नेहमी जय रुपाचा?
प्रेम का हरणार आहे?
आयुष्याची हीच अखेर
राख जी उरणार आहे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा