आजही अप्रूप वाटे कवडश्यांचे ...!
- अन उन्हाशी खेळणार्या आरश्यांचे...!
पाप केले मागच्या काही पिढ्यांनी...
भोग प्रायश्चित्त आता वारश्यांचे...
नावही ज्यांचे कुणाला ज्ञात नाही,
कोण कौतुक रोज त्यांच्या बारश्यांचे...!
कोरडा दुष्काळ आहे...समजतो मी...
...सूरही गेले कुठे पण पावश्यांचे...?
ठेवला नाही कुणाचा भरवसा मी
..एरवीही काय होते, भरवश्यांचे...?
- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा