अनेक वर्षे जमीन उजाड पडून आहे
अनेक वर्षे जमीन उजाड पडून आहे
न्याय तेवढा भरल्या ढगात लपून आहे
कसे राहिले कामाविनाच मजूर काही?
शहरामध्ये जुनी इमारत अजून आहे
ढग चालतात, रस्ता धावे, नदी वाहते
गेलो दमून इतका की मी बसून आहे
म्हटले मुद्दाम ,"सवड काढून ये जरा कधी"
आली नाही माझ्यावर ती रुसून आहे...
गोड बोलणे, भाषणबाजी, वाटाघाटी
निवडणुकीची तयारी कशी कसून आहे ..
हे मना तुझा ठावठिकाणा कळू दे मला
कसे यायचे ? सरळ रस्ता कुठून आहे?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा