इये उल्हासनगरी होइ काफिर पीर एखादा
इथे वर्षात केवळ पाच होतो 'मीर' एखादा
सहा महिन्यात अडचण एक, पण ती वर्षभर चाले
रसिक हातात बारामास धरतो धीर एखादा
लवंगी माळ उडल्यावर फुसुक्कन वाजते काही
लढाई संपल्यावर येत राही तीर एखादा
हजारो वर्ष गेल्यावर सपाटीचा गिरी होतो
परंतू येथला नसणार तेथे वीर एखादा
सफाई यायला तय्यार नाही या गझलमध्ये
किती सांभाळले, निघतो तरी खंजीर एखादा
इथे धुमकेतुचे प्रतिसाद अन धुमकेतुच्या चर्चा
इथे झाकोळला जाईल कारागीर एखादा
जिथे होणार नाही एकही भूकंप साधासा
तिथे चालायला रस्ता स्वतः तू चीर एखादा ( अजय जोशी यांचा शेर )
"गझल ही आरसा आहे तुझ्या अस्वस्थ ह्रदयाचा..
कधी झाला असावा घाव ही गंभीर एखादा !" ( ज्ञानेश यांचा शेर )
श्री अजय जोशी व श्री ज्ञानेश यांनी सुचवलेले शेर आवडल्यामुळे मी ते गझलेत ऍड केले आहेत. अर्थातच हे फक्त या साईटपुरते आहे. इतरत्र मी ते शेर कधीच सादर करणार नाही.
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा