अंतरे राखूनही तू आज माझ्या काळजाला छेडले
मोकळी असले तरी बेताल तुझिया आठवांनी घेरले
माहिती होते मला उत्सूक नाही तू जराही भेटण्या...
वास्तवाचे भान असुनीही तुला स्वप्नी जरा मी भेटले
चांदणे आकाश भरुनी वाहते आहे, जशी गंगा इथे -
मुक्त करते पापियांना तेज तैसे वाढते चंद्रातले
सांजवेळी सूर्य कलता जीवनाचे भाष्यही समजून घे
दाखवे ती सावली की प्रेम वाढावे तुझ्या-माझ्यातले
अंत नाही प्रीतिला माझ्या-तुझ्या, स्वर्गी जरी आहेस तू...
भेटण्याला जीव आहे सोडला, नाही तुला मी सोडले
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा