कधी संयमी, कधी अनावर आपण दोघे;
हो-नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे.
क्षुल्लक-क्षुल्लक कारणांवरुन भांडण करतो;
स्वत:च हसतो नंतर त्यावर आपण दोघे.
बोलायाचे तेच बोलतो नेमके तरी,
उगीच करतो आवर-सावर आपण दोघे.
कशास येतो अहंकार हा आपल्यामधे;
शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे.
जरी माहिती कहाणीस ह्या शेवट नाही;
कधी न घेतो तरी मनावर आपण दोघे.
- संवेदना रायटर्स कंबाईन, अकोला
मोबाईल : ९९२३०७५७४३
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा