कोणी ना बसतो तिच्याजवळ ती आगीपरी भासते
मी जेव्हा नसतो तिच्याजवळ ती आगीपरी भासते
जाळो शायर ती पतंग जैसा, भासे गझल जादुई
जातो वापस तो तिच्याजवळ ती आगीपरी भासते
दुनिये मत्सर तंत्र, मंत्र यांचा, प्रत्यक्ष ही कारणे
दाह असा असतो तिच्याजवळ ती आगीपरी भासते
सूर्याला चटका बसेल ऐशी, गझलेतली उष्णता
लाव्हा रसरसतो तिच्याजवळ ती आगीपरी भासते
वाटे थंड किती तिच्यात बुडता, डोईवरी घागरी
नेणारा फसतो तिच्याजवळ ती आगीपरी भासते
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा