जीवनाचे रोज दावे
वाद्ळाचे पेहरावे
माणसाची हाव वाढे
वेदनेचे चोर कावे
अंत नाही वंचनेला
ओंजळीला खूप चावे
शोषणारे या भुकेला
भाकरीचे हेलकावे
कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे
जीवनाला भाजणारे
पापण्यांचे बंद आवे = बापू दासरी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा