भेट

सोनाली जोशी - ⏱ १ मिनिट

भेट


न पाहिले डोळे भरुनी तुला ना बोलले काही
तव भेटीची इच्छा मनास माझ्या जाळत राही


तुला भेटण्याला कितिक अंतर चालून आले  मी 
अशी गुंगले.. मैलांचा दगड मला दिसला नाही


चल निरोप घेऊ आपण दोघे या वळणावरती
भिन्न आपले मार्ग जरी बोलतील काहीबाही


सरली भरती अन् उरली मागे एकाकी रेती
काय अता चंद्राला मागावी प्रीतीची ग्वाही?

 त्या मुकुंदास कळवा माझा सांगावा  कुणीतरी
 'ये माघारी ', अजून तिथे  बासरीवेडी  राही


मला कळेना कशास करते उगा काळजी त्याची?
घर माझे माघारी माझी कधी न चिंता वाही!


- सोनाली जोशी


 

गझल