चांदणे प्रेमातले....

ग. वि. मिटके - ⏱ १ मिनिट

चांदणे प्रेमातले....

हे भासही प्रेमातले, हे वागणे प्रेमातले
जे प्रेम ह्रदयी दाटले, ते मागणे प्रेमातले..

तुझी लाज ही डोळ्यातली अन् हासणे गालातले
स्वप्नामधे तूज पाहणे, अन् जागणे प्रेमातले..

हा चांदवा चेहरा तूझा अन् रात्र तव केसांपरी
बेधुंद तुजवरी मी सखे, अन् चांदणे प्रेमातले..

ही सोबतीला साथ तुझी अन् चालणे प्रेमातले
त्या चंद्रमेच्या साक्षीने ते थांबणे प्रेमातले..

माझे तुझे नाते असे जणू चंद्रमेचे चांदणे
मम प्रेम ह्रदयी तूझेच गं, हे सांगणे प्रेमातले...

हे भासही प्रेमातले, हे वागणे प्रेमातले
जे प्रेम ह्रदयी दाटले, ते मागणे प्रेमातले..

-ग. वि. मिटके

[गझल फक्त टीजरमध्ये टाकू नका. दिसणार नाही. टीजर टेक्स्टएरियाच्या खालच्या टेक्स्टएरियातही मजकूर असला तरच तो मजकूर दिसेल.]

गझल