याद येतो चेहरा हसरा तुझा
ज्यात फसलो, तोच हा चकवा तुझा
नवल आहे, चोर नाही एकही
खूण करतो सारखा खजिना तुझा
स्पर्श दूरच, पाहिले केवळ तुला
केवढा बसला मला झटका तुझा
सर्व ते आकार आकर्षक तुझे
कोणता स्मरणात ठेवावा तुझा
काय तुजपाशी बघायासारखे ?
बहरला गर्दीमुळे रस्ता तुझा
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा