(कमीत कमी बहराची गझल करावी असा विचार एकदा डोक्यात आला आणि एक प्रयत्न केलाय...)
चोर आहे?
थोर आहे!
पूर्ण होता -
कोर आहे
बस जिभेतच
जोर आहे!
ओठ - पिकले
बोर आहे!
शांततेचा
शोर आहे
प्रेत आणि
दोर आहे
ही गझल ना?
घोर आहे!
नचिकेत जोशी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा