दिसतो तुला जरी मी.........

वैभव देशमुख - ⏱ १ मिनिट

दिसतो तुला जरी मी हिरवा अजून आहे
र्हुद्यात खोल माझ्या वणवा अजून आहे


विसरून वाट जातो माझ्याच मी घराची
वळणावरी जुन्या त्या चकवा अजून आहे


माझाच चेहरा तो दिसतोय डोळियाना
की आरसा  तुझा हा फसवा अजून आह्वे


आहे अजून मजला बिल्गून दुख माझे
माझ्यावरी सुखा॑चा रुसवा अजून आहे


म्रुत्यो म्हणे निघाला भेटावयास मजला
आहे खरेच की ही अफवा अजून आहे.....


                     वैभव देशमुख

गझल