दु:ख माझे सोबती !
तू बिलोरी वेदनांची लालसा आहे !
मी नकोशा चेहर्यांचा आरसा आहे !
सज्जनांना लाभलाहो न्याय हा अंती
मी भिकारी लक्तरांचा वारसा आहे !
पुंडलीका वीट देवा तू नको मांडू
विठ्ठलाची आस कोठे माणसा आहे ?
फास घ्याया लागले ते वीर जे होते
का निखारा थंड आता कोळसा आहे ?
बोलली तू 'सोड आता गाव हे माझे ! '
मी तसा सोडून दुनिया छानसा आहे !
दु:ख माझे सोबती अन् सोयरे होते
पण सुखाचा घाव आता खोलसा आहे !
प्रशांत वेळापुरे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा