गारवा..!

मी अभिजीत - ⏱ १ मिनिट



कुंद या हवेत दाटलाय गारवा..
मज तरी असा कुठे हवाय गारवा ?


हे जळावरी कशास दाटले धुके,
रूप न्याहळीत गुंतलाय गारवा..


लोकरीत अंग सर्व झाकुनी कसा,
आज तो विचारतो कुठाय गारवा..


पांघरून शाल मी सुखात राहिलो
मज कुठे अजून झोंबलाय गारवा ?


रात चंद्रपावलात थांबली तिथे.
सोबतीस आज थांबलाय गारवा..


गारठून एकटे कशास जायचे ?
ये मिठीत बघ पळून जाय गारवा..!


                            --   अभिजीत दाते

गझल