गेले हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...
गेले हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...
केला दगा जरासा माझ्याच पैंजणांनी
सांगावयास येथे उरले न आज काही
केली कशास गर्दी डोळयात आसवांनी?
स्वप्नात भेटण्याचे देते वचन हरीला
राधेस कैद केले या रीतशृंखलांनी
होते दडून काही भलतेच शब्द ओठी
लागे मला सुगावा त्यांच्याच त्या खुणांनी
कोणी हसून गेले, कोणी रडून गेले
खोटीच वाहिलेली श्रद्धांजली फुलांनी
हातात काय येथे उरले नि काय तेथे.
त्याचा हिशोब द्यावा परदेशवासियांनी
(अल्याड पल्याड हे शब्द बदलेले आहेत. दूरस्थ या मनांनी
- परदेशवासियांनी केले आहे)
आला वसंत येथे घेऊन विरह गीते..
फुलण्यास ना करावी बागेतल्या कळ्यांनी...
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा