गप्प २

तिलकधारीकाका - ⏱ १ मिनिट

जरूरी आमची इतकी जगालाही कुठे आहे?
जगाची गरज तितकीशी अम्हालाही कुठे आहे?


दहाव्याला स्वतःच्या भोजनाला माणसे येती
मिळावा मोक्ष ही इच्छा शवालाही कुठे आहे?


अरे वर्षानुवर्षे जगत आलो जन्म आपण जो
निवड 'तो घ्यायचा कोठे' कुणालाही कुठे आहे?


न देवाने दिली बुद्धी पशूला ऐकले होते
इथे लक्षात आले माणसालाही कुठे आहे?


तुम्हा प्रतिसाद माझे बोचल्याने गप्प झालो मी
तसा काट्याविना  परिचय फुलालाही कुठे आहे?


किती वर पोचलो जाणुन त्याचे कर्ज फेडावे
अपेक्षा एवढी चित्ती जिन्यालाही कुठे आहे?


 

गझल