गुलाबपाणी

गौतमी - ⏱ १ मिनिट

शिंपडायला गुलाबपाणी येउन जा
आज आपल्या जुन्या ठिकाणी येउन जा

काय ज्यामुळे तुझी न होऊ शकले मी
सारवायला तुझी कहाणी, येउन जा

तू न यायचास जाणते, पण म्हणायची
खोड लागली जुनी पुराणी "येउन जा"

एक काळ गीत गायचा 'जायला नको'
आज आळवे करूण गाणी 'येउन जा'

काळजी मला, उगी तुला आठवेन मी
संपवायला जुनी निशाणी येऊन जा

वेड लागले कुणी म्हणे 'गौतमी'स या
बोलते हवेमधे दिवाणी येउन जा



















गझल