मिळेल त्याच्यामधेच राहू खुशाल मी तू
नको नको ते नको विचारूस गौतमी तू
इलाज नाही इथे ऋतू, माणसांस काही
कळी सुगंधास वा दिखाव्यास मौसमी तू
तुझ्यात माता तुझ्यात पत्नी तुझ्यात दासी
तुझ्यात वारांगना जगाची, तुझी कमी तू
कधी कधी सासरास होते तुझीच होळी
दिलास हुंडा? करून घे रंगपंचमी तू
कधी कुणाचा न दोष वाटेल हुंगणार्या
तुझीच शंका, जगामते गैरलाजमी तू
पती कुठे शेण खायचा तो हिशोब नाही
सती तुला लावतील जाण्यास घे हमी तू
~~~ही स्त्रीवरील प्रातिनिधिक गझल आहे~~~
गौतमी -
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा