ही भूमी

प्रदीप गांधलीकर - ⏱ १ मिनिट


संतांची  ही  भूमी  आहे
भक्तांची  ही  भूमी  आहे

गेले  फाशी  देशासाठी
वीरांची  ही  भूमी  आहे

हिंसेला  जिंकू  शांतीने
गांधींची  ही  भूमी  आहे

नारी  आहे  देवी  येथे
सीतेची  ही  भूमी  आहे

गाणी  गाती  स्वातंत्र्याची
पंतांची  ही  भूमी  आहे

नाही  थारा  गद्दारांना
सार्याची  ही  भूमी  आहे


 

गझल