ही घडी दे !!!

supriya.jadhav7 - ⏱ १ मिनिट

ही घडी दे !!!
.
*

चांदण्याचा दाहदायी ज्वर नको !
दे मिठी दे.......! आर्ततेचा स्वर नको !!

*

रोमरोमी स्पर्श चंदन-केवडा !
एक फ़ुंकर.......! मोतियांची सर नको !!

*

धुंद तू ही , धुंद शेजी मोगरा !
श्वास हळवे......! बोलण्याची भर नको !!

*

मीलनांती ना उरावी भिन्नता !!
एक रुपे..........! व्यर्थ मादी-नर नको !!

*

ध्रुवतारी स्थान सजणा स्पंदनी !
ही घडी दे........! कोणताही ’वर’ नको !!

*

-सुप्रिया (जोशी) जाधव.

गझल