ही झाडे पेटवली कोणी
अनाथ केले पक्शी कोणी
तळ डोहाचा निरखत होतो
गढूळ केले पाणी कोणी
कुणी अशी माकडे निवडली
दिली तया॑ना पोथी कोणी
तो हिटलर आहे तर राहो
मीही नाही गा॑धी कोणी
ज्यावर होते आग्यामोहळ
फा॑दी तीच झटकली कोणी
मला सारखे जाणवते हे
आहे माझ्या पाठी कोणी
असला तर माझ्यातच आहे
माझा मोठा वैरी कोणी
तो मातीवर उतरत नाही
हवा एवढी भरली कोणी
विणू लागला आहे जाळे
देही आला कोळी कोणी...
- वैभव देशमुख
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा