हॉटेल पॅराडाइज, पुणे. दि. १९.०१.०९ रात्री ११.३०

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

पाहणे लाजून खाली अन कसेसे हासणे
विसर पुर्वी जाहलेले, सोड परके भासणे

काय ही मागासण्याध्ये पुढाकारी तुझी?
की पुढाकारीच माझी त्यामुळे मागासणे

मी तुझ्यासाठी न आलो, माझियासाठी न तू
काय मी आ वासणे अन काय तूही त्रासणे

वाचला मसुदा तरीही घेतले कंत्राट मी
मी तुला आरासणे अन तू तुला जोपासणे

"घ्या चहा" बोलून बाकी पाहणे शुन्यामधे
हे दहा रुपयात म्हणजे फक्त पैसे नासणे

गझल