हवे मधे किती छान गारवा होता.....

खलिश - ⏱ १ मिनिट

हवे मधे किती छान गारवा होता
मना मधे किती शांत पारवा होता !.....१.

पळो पळी कशी सारखी मजा येते
तसा विस्तव नी आत गारवा होता !.....२.

कसे मला भिजवतात गार हे वारे !
मना मधे पक्षी गात मारवा होता.....३.

कुठे तरी विषादात सावली शोधू
जिथे बघू तिथे आज रानवा होता !.....४.

चला बघू नवे छान आरसे पाहू
जुना दिसे तरी, चेहरा नवा होता !.....५

असे किती जळावे ? असेच का व्हावे ?
मनो मनीं जळत एक काजवा होता !.....६.

` ख़लिश '-विठ्ठल घारपु रे /२-९-२००९.

गझल