लावली छातीस माती
सुर्य आला सहज हाती ...
देव नाही देत भाकर
सांगतो ठोकून छाती...
हात केला वर जरासा
लागले आकाश हाती...
बंद खिडक्या बंद दारे
स्वागताच्या जाहिराती...
रक्त जेव्हा थंड होते
बंद पडते, सर्व क्रांती...
जा विचारा विट्ठलाला
फालतू आहेत जाती...
कोरडा पाऊस आला
अन् करपली सर्व नाती !
- अभिषेक उदावंत ( संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला )
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा