जगणे असते अपुले आपण जगू तसे
भोवतालचे दिसते आपण बघू तसे...
स्वप्ने, कविता, आठवणी अन रोजनिशी
खजिने वाढत जाती आपण भरू तसे...
येता-जाता नकळत गाणे गुणगुणतो
गाणे मनात असते आपण म्हणू तसे...
पाउस आहे खुणावतो बघ केव्हाचा!
चल ये, आपण पुन्हा एकदा भिजू 'तसे'...
नको वसंता, कसली सक्ती झाडांना;
'अजब' तयांना जसे हवे, दे फुलू तसे...
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा