लक्षात येत आहे माझ्या जरा जरा
गंभीर जेवढा मी हा जन्म वाभरा
निष्णात पारध्याने आभाळ व्यापले
आता कुठे भरार्या घेशील पाखरा
का झाकला कुणी हा का झाकला असा
माझ्याच चेहर्याने माझाच चेहरा
मी वाटतोय हल्ली काळा तुझ्यामुळे
वाटायचे मला तू आहेस पांढरा
निष्पाप वाटणेही साधायला जमो
निष्पाप वागण्याची पेलायला धुरा
मी व्यक्त होत जाणे टाळायला हवे
कहीतरी करा हो काहीतरी करा
~वैवकु
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा