...जन्माचे आवर्तन सात...

शैलेश कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

...गझल...


दाद मिळाली ज्या भावात ,
विकत घेतली हातोहात !


चुका सातशे करण्याला ,
जन्माचे आवर्तन सात !


छोटे वय मोठ्यास म्हणे,
"हात ! हारे ! हातरे ! हात !"


पणतीच्या व्यासंगाला
वातीच्या देहाचा घात !


भिंतीला जाणीव हवी
वार्‍याचा पुरतो आघात!


तुझे नियंत्रण मरणावर ,
जगणे तर माझ्या हातात ! 


...शॅलेश कुलकर्णी


 


 

गझल