काळजावर वेदनांची चाल आहे
'हासणे' माझी पुराणी ढाल आहे
काल ज्याची मागणी संपून गेली
आणला मी नेमका तो माल आहे
ते म्हणाले 'खा हवा अन् आसवे प्या'
'बांधवानो, हे सुगीचे साल आहे!'
द्या मते,लक्षात ठेवा की निशाणी
'पाच बोटे उमटलेला गाल आहे!'
सम जुळेना कां सुखाशी एकदाही?
जीवनाचा, हाय! चुकला ताल आहे
----------------------------------------------------------
जयन्ता५२
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा