उरी काळज्या जेवढ्या माजल्या
कवी जाहलो आणि नावाजल्या
जरा लाभला तोष बघताच त्या
कशा मत्सरी काळज्या खाजल्या
मला भांडणे पाहण्याची मजा
जुन्या काळज्यांना नव्या पाजल्या
बने एकका काळजीची गझल
जगाला दिल्या केवढ्या गाजल्या
कधी बोलविता मी कुरवाळण्या
जुन्या धावल्या नवशिक्या लाजल्या
नका हाकलू फार नाराजल्या
मनाआतुनी काळज्या वाजल्या
चिताही म्हणे हा जळावा कसा
धगी काळज्यांच्या मला भाजल्या
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा