कधी स्वतःच्या जगण्यालाही विटलो
कधी अचानक श्वास कुणाचा ठरलो
किती, काय अन् कशाकशाचे सांगू...
कुणाकुणासाठी मी दाने हरलो
कुठे माहिती होते छक्के-पंजे ?
मी तर सर्वांना आपला समजलो
जगा न जमली चाल जराही माझी
जगासारखे थोडे मग सरपटलो
धरती इतकी चिंब कशाने झाली ?
कसा? कुठे? मी... केंव्हा? कधी बरसलो ?
मित्र म्हणावा असा कुणीच मिळेना
जो शत्रू नव्हता त्याचा मग बनलो
पडलेल्यांना हात देत सावरले
म्हणून थोडा मागे मागे पडलो
वादळ उठवावे असे न केले, पण...
जीवन माझे विश्वासाने जगलो
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा