आयुष्याची तूच कमाई..
बाकी दुसरे काही नाही...
याच्यानंतर जेव्हा भेटू..
अपुल्याबद्दल बोलू काही..
तुला पाहिजे तसा वागतो...
म्हणून माझी किंमत नाही...
तोंडावरती गोड बोलतो..
पण माघारी सुरू लढाई..
जेव्हा आपण खोटे पडतो..
देतो त्यावर किती सफाई....
असे बोलतो आपण दोघे..
जसे आपले काही नाही...
तूच बोलली मला स्वतःहुन..
मनात माझ्या नव्हते काही..
नंतर बसतो घंटोघंटे..
आधी करतो उगीच घाई..
..........अभिषेक उदावंत.
अभिषेक उदावंत.
"संवेदना रायटर्स कम्बाईन." अकोला 444001.
मो. नं. : 9922646044.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा