कसा आज अंधारही सोसवेना
मला आज तो चेहराही छळेना
कितीदा मनाला दटावून झाले
दिलासा दिला, ते तरीही हसेना
नसे खास दुष्यंत हा ओळखीचा
तुझी अंगठी आज मागून घे ना
तुझ्या हासण्याने कळाली खुशाली
असे हास्य खोटे मला का जमेना ?
कसे पाठवू मी असे शब्द साधे ?
"निरोपा"स का मायना सापडेना ?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा