कुठे तरी काही तरी जळत होते
मना मधे काही तरी सलत होते.....१.
नवी नवी नावे मला दिली त्यानीं
कधी मलम, ज़ख्म़ जुनी , हसत होते !.....२.
जरा कुठे बागे मधे बहर आला !
उन्हा मधे कोणी तरी रडत होते.....३.
चला जरा काही तरी नवे पाहू
नवे , जुने, स्वप्नात ही रडत होते !.....४.
कधी तरी माझ्या कडे बघा पाहू
असे तिथे कोणी तरी रटत होते.....५.
असे मद्य नाही दिले मला कोणी
फुलां मधे, काट्यांत ही गळत होते....६.
किती जुने हे फास, नी तरी ही का !
थवे पक्ष्यांचे नेहमी फसत होते ?.....७.
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / ०१-०९-२००९.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा