स्थैर्यास शोधताना भटकून जन्म गेला
येताच वेळ मजला झटकून जन्म गेला
घाले गळ्यात ती त्या हारापरीच मी ही
आधी विलास, नंतर, लटकून जन्म गेला
ठेवून लक्ष होतो त्या भामट्यावरी मी
संमोहनी निघाला, सटकून जन्म गेला
मी एकटाच नाही, तक्रार ज्यास होती
माझा कितीजणांना खटकून जन्म गेला
मी लांबवीत गेलो श्वासास एकएका
पण ऐकले तसा तो हटकून जन्म गेला
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा