कशी झाली ? कधी झाली ? तुझी माझी गडे मैत्री
मना कोडे सदा घाली, तुझी माझी गडे मैत्री
टपोरे चांदणे गेले, उटी लावून अंगाला
पहाटेला कशी न्हाली, तुझी माझी गडे मैत्री
कशासाठी लिहू मीही, चिठोरा चार शब्दांचा
खुणा गोंदी तुझ्या गाली, तुझी माझी गडे मैत्री
जरी भेटावया आलो, तुला मी चोरवाटेने
तरी सर्वा दिसू आली, तुझी माझी गडे मैत्री
फुकाची चंद्रतार्यांची, उदाहरणे नको आता
बरी आहे नभाखाली, तुझी माझी गडे मैत्री
-प्रसाद कुलकर्णी
पूर्व प्रकाशन - सकाळ कोल्हापूर ०६/०१/२००२
गझलांकित २००४
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा