तेच ते,तेच ते, सांगतो-
का तुझ्याशी असा वागतो?
ऐकुनी ही तुझे ,तेच ते...
का मनाशी हसू लागतो...?
दे तुझा हात , अन साथ ही...
मागणे सारखे मागतो...
चांदणे वेचतो , चंद्र हा...
मी उगा पाहतो , जागतो...
सावलीला तुझ्या , मी उभा
पावलांशी तुझ्या रंगतो...
मागतो चंद्र मी तेवढा...
...काय आभाळ मी मागतो,
फूल तू-! भोवती मी तुझ्या
मुक्त गंधापरी पांगतो...
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा