मारवाही... शेवटी... मंदावला
भैरवीचा सूर... आहे लागला
मैफिलीचा ताल गडबडला असा
केरवा, झपताल.. एकच वाटला
कोणती बंदीश गाते...? जिंदगी
षड्ज मज अद्याप नाही गावला
जीवना हा राग आहे कोणता ?
वेदना कवळून जो.. मी गायला
बोल ह्रदयीचा तुझ्या मी ऐकला
जो समेवर... मंद थोडा वाजला
मी प्रयासाने खुलवला जोगिया
पण गळ्याशी हुंदका हा दाटला
- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा