मदार... ( गझल )

निरज कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

मदार... ( गझल )

आरक्त लोचनांची, भाषा सुमार आहे...
माझ्याच हुंदक्यावर, माझी मदार आहे...

आश्वासने मिळाली, मजला जरी खुन्यांची;
निश्चीत आज होणे, माझी शिकार आहे...

मी हारलो तुझ्याशी, जाणून डाव सारा;
माझ्या पराजयाला, हसरी किनार आहे...

का घाव खोल केला, या लाघवी सुखाने?
पाहून 'हर्ष' आता, होतो थरार आहे!

'हे काव्य आज माझे, विकण्यास काढले मी!!'
हा कोणता निराळा, होतो प्रचार आहे???

गझला किती सुगंधी, मी रेखल्या प्रभावी;
निर्व्याज भावनेचा, चढला खुमार आहे...


- निरज कुलकर्णी.

वृत्त - आनंदकंद
गण - गागालगा लगागा गागालगा लगागा
मात्रा - २४
गझल