मी एकटीच येथे!!!(गझल).
.
*
श्वासात ना कुणाच्या ना स्पंदनात आहे,
मी एकटीच येथे माझ्या जगात आहे!
*
गोंजारले कितीदा माझ्याच मी चुकांना,
तो शाप पूर्वजांचा सलतो मनात आहे!
*
ना कोसळे कधीचा हा मेघ दाटलेला,
अश्रूच गोठलेला का या नभात आहे ?
*
ना दामिनी नभीची ना शुक्रतारकाही,
आश्रीत दीनवाणी माझ्या घरात आहे!
*
ऊद्रेक आठवांचा गाडून श्रांत झाले,
दूरस्थ संकटांची येते वरात आहे!
*
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा