मी जिथे नाही अशी जागाच नाही

बेफिकीर - ⏱ १ मिनिट

मी जिथे नाही अशी जागाच नाही
प्रश्न 'मी आहे कुठे' इतकाच नाही

बाप या दुनियेत, आकाशात आई
मी गझल आहे जिचा मतलाच नाही

लोक अस्तित्वामुळे दु:खात सारे
जन्मला नाहीच त्याला जाच नाही

हा कुठे पोचेल ही चिंता जगाला
देउया आधार ही भाषाच नाही

लाख भोंदू गाडती नामोनिशाणी
रोज आठवणार मी... शंकाच नाही

गझल