मी झाडांसम फुलणारा
वार्यासंगे डुलणारा
झोपाळ्यावर स्वप्नांच्या
मी अव्याहत झुलणारा
अव्यक्ताचा आशय मी...
मी मौनातच खुलणारा
सौंदर्याचा ध्यास असे...
सत्यावर मी भुलणारा
मी गंधित गुलबाख, जणू...
सूर्यास्ताला फुलणारा
--प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा