मी फुलांची रास झालो
मी फुलांची रास झालो,
श्रावणाचा मास झालो.
पाहुनी ’मधमस्त’ भृंगा,
यौवनाची आस झालो
जाहलो कंटाळवाणा
-बौद्धीकाचा तास झालो.
ने सवे वाऱ्या मला तू,
-मृत्तिकेचा वास झालो.
ऐकता दु:खे तुझी मी,
कोरडा नि:श्वास झालो.
ती म्हणाली ’प्रिय’ मजला!
-एवढा मी ’खास’ झालो?
मी तुझा ताईत होतो!
नी अता मी फास झालो?
शोधतो मी आज मूल्ये,
संस्कृतीचा ध्यास झालो.
साधला समतोल आता,
मी तुळेची रास झालो.
-मानस६
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा