केवढीही लाभुदे ख्याती इथे
होउनी जाशीलरे माती इथे
शाप, हेवा, राग, धोका,बोचणे
नांव यांना लाभले नाती इथे
धाप लागे मोजताना, एवढ्या
सागराचे शिंपले 'जाती' इथे
का बरे माझ्या मनाला खोदता?
काय आहे लागले हाती इथे?
लग्न उंटाचे असे साहित्य हे
भोवताली गाढवे गाती इथे
ती जरा लांबून जाते ते बरे
फार आगी बाळगे! वाती इथे
गंध आहे या जगासाठी तिचा
मी गुलाबाची धरे पाती इथे
शायरांच्या या महानगरीमधे
मीच राही एक देहाती इथे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा