मला ठावुक की...

जनार्दन केशव म्हात्रे - ⏱ १ मिनिट

मला ठावुक की... क्षणभर तिथे तू थांबली होती
जरा वळताच मी मागे, कशी तू... धावली होती


तुझ्या डोळ्यातली तगमग नि सोबत बोलणे हळवे
मनाची चलबिचल सारी तुझी... मी जाणली होती


जरा आठव पुन्हा राणी फिरुन ती भेट अवचितशी
तशी ती वेळ अजब नि तू किती.. भांबावली होती


मला स्मरते अजुन सारे... तुलाही आठवते आहे
तुझ्या ना जाणिवा परक्या... जरी रागावली होती


खुलासा मीच केला हा... तुला समजावण्यासाठी
खरे तर ते खरे... ज्याने मनी धास्तावली होती

जशी समजावली होती... समजुनी घेतली नाही
सरळ सोपी कहाणी ही... थेट ह्रदयातली होती


- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल