हसू खुलू दे मनासारखे
जरा घडू दे मनासारखे
तुझी दिठी केसांत माळुनी
मला सजू दे मनासारखे
मुठीत बांधू नको कळीला
तिला फुलू दे मनासारखे
खुळे तुझ्या स्वप्नात जागते,
मना करू दे मनासारखे
दंवात न्हाते पहाट ओली,
धुके झरू दे मनासारखे
सुरांसवे माझ्या काव्याचे
दुवे जुळू दे मनासारखे
पसायदानी मागे ज्ञाना,
जनां मिळू दे मनासारखे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा