सुकलि मोगर्याचि फुले तु माळ्लेलि
तुटलि वचनेहि दिलि घेतलेलि
हातात हात होते,ओठांत ओठ होते
जवळिक जैसि कळि न उमललेलि
होते सुगंधि श्वास, सहवास भारलेले
आता फुले जणु कि देठांत खुडलेलि
नाजुक बोल होते दवबिंदुपरि तुझे ते
झालि विखारि वाणि मधांत मुरलेलि
मधुचंद्र तु सुखाचा, तु चांदणे रुपाचे
आता जिवनि रात अंधारलेलि
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा